अनादिकालापासून हत्तीचा वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग केला जात आहे. अगदी युद्धांपासून ते
आजकालच्या अवजड सामानाची उचल करण्यासाठी सुद्धा हत्तींचा उपयोग केला जातो. आज हत्तींचा
उपयोग कमी झाला असला तरी त्यांच्या दातांसाठी सुद्धा त्यांची बेसुमार कत्तल करण्यात आली. परंतु
माणसाच्या अमानुषपणाची एक घटना उत्तर प्रदेश येथून आली आहे, येथे एका माहुताने हत्तीला गेले ५०
वर्षे एका साखळदंडात बांधून ठेवले होते. त्याच्यावर खूप अत्याचार केले जात होते, त्याला खायलासुद्धा
नीट दिले जात नव्हते. तिथल्या प्राणी मित्र संघटनेला जेव्हा ह्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्या
हत्तीची तेथून सुटका केली. आणि त्याला अॅनिमल केअर सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. जेव्हा त्याची
सुटका केली तेव्हा साखळ त्याच्या पायात रुतली होती. ५१ वर्षीय ह्या हत्तीचे नाव राजू आहे.